Posts

वाट पाहताना: १

Image
नेहमीप्रमाणे घरातून निघण्याच्या खूप अगोदर मी गॅलरीत बराच वेळ उभा राहिलो. श्रावणातल्या अल्लड सरींसारखी अधूनमधून ती तिच्या दारापाशी येउन गेली. तिचं ते क्षणात येणं क्षणात पुन्हा नाहीसं होणं मला फार सुखावून जायचं. कारण ती दाराआड होऊनही खिडकीतून माझ्याकडे पाहत असायची. मला ती अशा वेळी दिसत नसली तरी जाणवायची. ती नाहीशी होताच माझ्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव तिला टिपायला आवडत असावं बहुदा. तिचं उगाचच मग मोठ्याने हसणं, बहिणीशी मोठ्याने बोलणं... मला ऐकू जाण्यासाठी; आणि अवचित मध्येच त्या ४०-५० मीटर अंतरावरूनही धीटपणे माझ्या नजरेला नजर देणं हे सारं अनुभवणं म्हणजे माझ्यासाठी गालावरुन मोरपीस फिरल्यासारखं होतं. "तू तिला थेट भेटून बोलत का नाही रे?" परशा मला नेहमीच हा प्रश्न विचारायचा. बरेच जण विचारायचे. खरंच! मी का नाही विचारत तिला? कितीतरी वेळा तिचं नुसतं नख तरी दिसावं, आवाज तरी ऐकू यावा, तिचं त्या घरात असणं तरी जाणवावं यासाठी मी तासनतास तिच्या दारावर डोळे ठेउन असायचो. तिला ते ठळकपणे माहिती होतं. पुढे तिला माझ्या वाट पाहण्याची जणू इतकी सवय पडली की नकळत ती देखील माझी वाट पाहू लागली. एकमेकांची...

वाचनालय: २

Image
बाजारातून घरात येइपर्यंत माझ्याने काही धीर धरवत नव्हता. पप्पा नि मी रिक्षात बसलो. आणि मी पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केलीसुद्धा! घराचा उंबरठा ओलांडेपर्यंत मी आफ्रिकेच्या दाट जंगलात पोहोचलोसुद्धा! आईला मी माझं गुलाबी कार्ड दाखवलं. हातातलं भलं मोठं पुस्तक सुद्धा दाखवलं. "आता हे आणलंय तर नुसतं तेच वाचत बसू नकोस. अभ्यासाचं पुस्तक पण वाचत जा. परिक्षेत काही टारझन येणार नाही." आईने टारझनचं आमच्या घरात स्वागत केलं ते असं. जर खरोखरीच टारझन माझ्यासोबत घरी आला असता आणि त्याने आईचे हे शब्द ऐकले असते तर तो पण बिच्चारा वाईट वाटून पुन्हा आफ्रिकेत गेला असता. आई म्हणजे पण ना आईच आहे. टारझन पुस्तक उघडून मी थेट आफ्रिकेच्या जंगलात पोहोचत होतो. एकदम डायरेक्ट. मनगटाएवढ्या वेली पकडून सूर्याचा प्रकाशही न पोहोचणाऱ्या त्या महाभयंकर जंगलात टारझनच्या मागोमाग माझ्या उड्या पडायला लागल्या. आईसाठी तसाही मी माकड होतोच. पण आई काही टारझनच्या आईसारखी नव्हती. "टारझनची आई एक वानर असून त्याच्यावर किती प्रेम करते आणि तू साधी चहाबरोबर मला दोन खारी जास्तीची पण देत नाहीस," यावरून आमच्यात वादावादी व्हायला ...

वाचनालय: १

Image
          रविवारी बाजारात पप्पांसोबत जाणं, ही लहान असताना माझ्यासाठी एक मोठी पर्वणी होती. त्याची अनेक कारणंही होती. बाजारात जातायेता आमच्या दोघांत खूप मोकळा संवाद व्हायचा. माझा स्वभाव तसा फारसा अबोल आणि मनस्वीच अधिक. वर्गातल्या बाकावर शरीर असलं तरी मन मात्र शाळेशेजारच्या तळ्याच्या काठावर किंवा अलीकडील बाजूला असलेल्या फुलांच्या बागेतील फुलपाखरांच्या पंखांवर. रस्त्याच्या कडेनं चालताना, संध्याकाळी सांजावताना उदबत्तीचा सुवास छातीत भरून घेताना, पाटीवर कधीही न पाहिलेल्या पण परिचित वाटणाऱ्या घराचं चित्र रेखाटताना मी कुठल्या तरी भलत्याच जगात हरवून जायचो. वेळ, काळ कशाचंही भान तेव्हा उरायचं नाही. आणि यामुळे अनेकदा शाळेत बाईंचा आणि घरात आईचा खरपूस मार खायला मिळत होता. त्यावेळेपासूनच एक व्यक्ती मात्र माझ्या या अशा वेडेपणातलं वेगळेपण माझ्या लक्षात आणून देत होती. पप्पा!           रविवारच्या दिवशी पप्पांसोबत बाजारात निघाल्यावर माझ्या अनेक शंकांचे निरसन होई. शिवाय अनेक नवीन शंकाही पप्पा माझ्या मनात तेव्हाच निर...