Posts

Showing posts from June, 2019

वाट पाहताना: १

Image
नेहमीप्रमाणे घरातून निघण्याच्या खूप अगोदर मी गॅलरीत बराच वेळ उभा राहिलो. श्रावणातल्या अल्लड सरींसारखी अधूनमधून ती तिच्या दारापाशी येउन गेली. तिचं ते क्षणात येणं क्षणात पुन्हा नाहीसं होणं मला फार सुखावून जायचं. कारण ती दाराआड होऊनही खिडकीतून माझ्याकडे पाहत असायची. मला ती अशा वेळी दिसत नसली तरी जाणवायची. ती नाहीशी होताच माझ्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव तिला टिपायला आवडत असावं बहुदा. तिचं उगाचच मग मोठ्याने हसणं, बहिणीशी मोठ्याने बोलणं... मला ऐकू जाण्यासाठी; आणि अवचित मध्येच त्या ४०-५० मीटर अंतरावरूनही धीटपणे माझ्या नजरेला नजर देणं हे सारं अनुभवणं म्हणजे माझ्यासाठी गालावरुन मोरपीस फिरल्यासारखं होतं. "तू तिला थेट भेटून बोलत का नाही रे?" परशा मला नेहमीच हा प्रश्न विचारायचा. बरेच जण विचारायचे. खरंच! मी का नाही विचारत तिला? कितीतरी वेळा तिचं नुसतं नख तरी दिसावं, आवाज तरी ऐकू यावा, तिचं त्या घरात असणं तरी जाणवावं यासाठी मी तासनतास तिच्या दारावर डोळे ठेउन असायचो. तिला ते ठळकपणे माहिती होतं. पुढे तिला माझ्या वाट पाहण्याची जणू इतकी सवय पडली की नकळत ती देखील माझी वाट पाहू लागली. एकमेकांची